बा विठ्ठला | Baa Vitthal | Latest Marathi Vitthal Song | Dyaneshwar Meshram & Karan Deshmukh
Description
A soulful Marathi devotional song dedicated to Lord Vitthal, filled with devotion, emotion, and the spirit of Pandharpur bhakti.
Experience the divine energy of Vitthal through this heartfelt musical journey. ❤️🚩
बा विठ्ठला
गीत: चित्रा देशमुख
संगीत: अभिजित जोशी
गायक: ज्ञानेश्वर मेश्राम, करण चित्रा देशमुख
संकलन, छाया, दिग्दर्शन: जागेश्वर ढोबळे
सह छाया: संजय साळवी.
संगीत संयोजन: गणेश सातार्डेकर
ध्वनी मुद्रक: श्रीकृष्ण सावंत (विधी व्हाईस स्टुडिओ मुंबई )
व्हीएफक्स डी आय: अमित धनराज
कला: विश्वविनायक
रंग आणि वेशभूषा: अतुल शेबे
कलाकार: ज्ञानेश्वर मेश्राम, करण चित्रा देशमुख आणि ॐकार रेल्वेप्रवासी भजन मंडळ विरार.
ज्ञानेश्वर कोरगांवकर,राकेश साळवी,प्रमोद तेरेकर,प्रकाश झनके,कृष्णा तावडे, चेतन बाबर
🙏 विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीमय प्रवासात सहभागी व्हा.
#BaaVitthal #VitthalSong #MarathiBhaktiGeet #VitthalBhajan #MarathiSong #Pandurang #BhaktiSong #shemaroomarathbhakti #shemaroo #marathibhakti
Lyrics :
जय गजानन
बा विठ्ठला
नाही उरले तुझ्या माझ्यात अंतर
झालो विठूमय अंतरबाह्य विठ्ठल
तुझ्या नामापुढं माझं सारं मी पन सरल
असं नात भक्तीच तुझ माझ जडलं
सारं तुझ्याच स्वाधीन माझा कर सांभाळ....
बा विठ्ठल......................!!धृ!!
फार अवघड बिकट,तुझ्या पालखीची वाट
झाली पायाची चाळन,चढ चढूनिया घाट.
तुझ्या वारीचा महिमा,तुच जाणे गा विठ्ठला.
जो ही करेल ही वारी,त्यास मोक्ष गा लाभला.
इथे थोर ना लहान,सारे माऊली समान
एकामेका चरणाशी,सारे घाली लोटांगणं.
ऐसा वैष्णवांचा मेळा, गळा तुळशीची माळा.
होता नामाचा गजर हसतोया तो सावळा.........
वारी चुकली नाही आजवरी विठ्ठला
कधी पावशील आस जीवा घोर लागला
किती जन्माचे भोग सरताही सरेना
ऐसा सासुरवास काही केल्या संपेना
ऐक माझी आर्त हाक घालितो गा साकड
बा विठ्ठल................!!1!!
ऐसा चंद्रभागेतीरी,आषाढीचा हा सोहळा.
देवळाच्या आत उभा,आतुरला तो सावळा.
टाळ मृदुंगाच्या संगे गजरात तो डोलतो.
भक्त विठूमय होवून,विठु,विठु नाम गातो.
जरी फाटका संसार,तरी मनाने उदार
वारी शिकविते हेच कैसा असावा आधार.
जिथे हजारो संताची पायधूळ गा चंदन
लावा माथी त्याचा टिळा, होई सफल जीवन .........
सांग आता तरी देवा काय चुकल माझं
कधी पालटेल गाड माझ्या नशीबाच
तुझ्याविना जगण्यात रस नाही राहिला
जळी स्थळी सदसर्वकाळ दिसे तू मला
आता बदल रे डाव पुरे झाला हा खेळ....
बा विठ्ठल........................!!2!!
जर गाणं आवडलं तर Like 👍 Share 🔁 आणि Channel Subscribe 🔔 करा.
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment - https://www.youtube.com/@shemaroomarathibhakti?sub_confirmation=1
Like, Comment and Share with your friends and family.
Follow Us On -
Facebook : https://www.facebook.com/ShemarooBhakti
Twitter : https://twitter.com/ShemarooBhakti
Instagram : https://www.instagram.com/shemaroobhakti
Whatsapp : https://bit.ly/ShemarooBhaktiWhatsappChannel